कोल्हापूर चित्रनगरीमध्ये

आपले स्वागत आहे

कोल्हापूर चित्रनगरी( फिल्मसिटी) कोल्हापुरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरेवाडी इथे स्थित आहे. तब्बल ७ एकर जागेत पसरलेल्या चित्रनगरीत चित्रपट आणि मालिकांसाठी अनेक प्रसंगात वापरले जाणारे सेट्स उपलब्ध आहेत.

सध्या कोल्हापूर चित्रनगरीत (फिल्मसिटी) पाटलांचा वाडा, स्टुडिओ– १ आणि स्टुडिओ– २, जोतिबा असे सेट्स उपलब्ध आहेत. याचबरोबर चित्रनगरीच्या विस्तृत परिसरात कलाकृतीच्या मागणीप्रमाणे सेट्स उभे करता येतात. मराठी चित्रपटांचा इतिहास कोल्हापुरात घडला. याच कारणामुळे कोल्हापुरला चित्रपट पंढरी म्हणून ओळखले जाते. चित्रपटांची दशकांची समृद्ध परंपरा कोल्हापूरला आहे. त्यामुळेच कोल्हापूर शहर आणि परिसरात कलाकार आणि तंत्रज्ञ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात.

प्रिप्रॉडक्शन आणि पोस्टप्रॉडक्शन या  सुविधा कोल्हापूर चित्रनगरीत (फिल्मसिटी) उपलब्ध नसल्या तरीही प्रिप्रॉडक्शन (चित्रिकरणापुर्वी) तसेच पोस्टप्रॉडक्शन (चित्रिकरणानंतर) कामांसाठी कोल्हापूर शहर आणि परिसरातले कलाकार, तंत्रज्ञ निर्माता आणि दिग्दर्शकांसोबत काम करायला उत्सुक आहेत. प्रतिभासंपन्न कलाकृतीचे माहेरघर म्हणून कोल्हापुरने नेहमीच आपला ठसा जगभरात उमटवला आहे. हाच वारसा जपण्यासाठी कोल्हापूर चित्रनगरी ( फिल्मसिटी) सज्ज आहे.

कला आणि कलाकृती मानवी जगण्याचा एक सुंदर अविष्कार आहे. नवनिर्मितीसारखी अद्भुत गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही. चित्रपट हा असाच एक अद्भुत अविष्कार. आणि याच अविष्काराला भव्य सेट्स आणि सृजनशील वातावरणाची साथ द्यायला उभी आहे कोल्हापूर चित्रनगरी.

आमची कोल्हापूर चित्रनगरी (फिल्म सिटी) दर्जेदार कलाकृती देण्यासाठी  कलात्मक दृष्टीसह उत्तम सुविधांसह एक मोठा परिसर तुम्हाला प्रदान करत आहे. कोल्हापूर फिल्मसिटीत (चित्रनगरी) आपलं मनापासून स्वागत आहे.

प्रशस्तिपत्र