कोल्हापूर चित्रनगरीकडे कसे पोहोचाल?
कोल्हापूर शहर तसे इतिहासप्रसिद्ध आणि नावाजलेले म्हणूनच ओळखले जाते. हे शहर राज्याशी उत्तमप्रकारे उद्योग, व्यापार या निमित्ताने जोडले गेले आहे. कोल्हापूर चित्रनगरीत येण्यासाठी तुम्ही हवाईमार्गाचा वापर करु शकता. कोल्हापूर फिल्मसिटीपासून केवळ ३ किमी अंतरावर अत्याधुनिक कोल्हापूर विमानतळ आहे. हवाईमार्गाच्या माध्यमातून कोल्हापूर हे मुंबई, बंगळुरु, हैद्राबाद, अहमदाबाद, तिरुपती आदी महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडले गेले आहे. यामुळेच विमानसेवेच्या माध्यमातून कलाकार आणि तंत्रज्ञ सहज कोल्हापुरात पोहोचू शकतात.
कोल्हापुरपासून मुंबई ३८० किमी, बंगळुरु ६१४ किमी, तिरुपती ८६० किमी, अहमदाबाद ८८५ किमी आणि हैद्राबाद ५४६ किमी इतकं अंतर आहे.
कोल्हापुरला येण्यासाठी आपण रेल्वेमार्गाचाही वापर करु शकता. हा पर्यायही आरामदायी आहे. राज्य सरकारचा परिवहन विभाग (एसटी) आणि खासगी वाहतूक व्यवस्थाही आपल्या सेवेस सज्ज आहे.
अन्य
आमच्या विषयी
चित्रीकरण स्थळ
कायदेशीर बाबी
नियम आणि अटी
गोपनीयता धोरण