आऊटडोअर लोकेशन्स

तसं पाहता कोल्हापूर चित्रनगरीमध्ये इनडोअर लोकेशन्स भरपूर आहेत आणि त्याचा वापरही अनेक कलाकृतींमध्ये होतो ;पण त्याचबरोबर चित्रिकरणात आउटडोअर लोकशन्सही कित्येकदा महत्त्वाची असतात. कोल्हापूर चित्रनगरीत अशीही लोकेशन्स आहेत. यामध्ये डांबरी रोड, कच्चा रस्ता, बस स्टॉप यांसारखे सेट्स आहेत. फिल्मसिटीत अनेक रिकाम्या जागी कलादिग्दर्शकाला कथानकाप्रमाणे हवा तो सेट उभा करता येऊ शकतो. थोडक्यात चित्रपट किंवा मालिकांसाठी कोल्हापूर चित्रनगरी परिपूर्ण अशीच आहे. मराठी चित्रपटाची समृद्ध परंपरा काळाच्या ओघात अशीच बहरत जावी हाच चित्रनगरीचा उद्देश आहे.

डांबर रोड

कच्चा रस्ता

बस स्टॉप