आगामी चित्रिकरण स्थळे (लोकेशन्स)

कोल्हापूर चित्रनगरी ( फिल्मसिटी) अजुन विकसित होत आहे. अनेक नव्या लोकेशन्सची भर थोड्याच काळात इथे पडणार आहे. सध्या नव्या लोकेशन्सचे काम युद्धपातळीवर सुरु असुन १ नवीन लोकेशन्स चित्रनगरीत (फिल्मसिटी) उभे राहणार आहेत. यात नवीन वाडा, बंगला, मंदिर, चाळ, रेल्वे स्टेशन, तीन होस्टेल्स इत्यादी लोकेशन्स असणार आहेत.

स्टुडिओ ३:

कोल्हापूर चित्रनगरी ( फिल्मसिटी) ही सातत्याने अद्ययावत आणि प्रगत होत आहे. स्टुडिओ – ३ मध्ये मेकअप रुम्स, रेस्ट रुम्ससह अन्य सुविधाही उपलब्ध असणार आहेत. स्टुडिओ ३ चं काम सध्या सुरु असुन लवकरच ते पूर्ण होणार आहे.

पाटीलवाडा नंबर २:

ग्रामीण चित्रपट किंवा मालिकांमध्ये गावचा पाटील ही बऱ्याचदा प्रमुख व्यक्तिरेखा असते, त्यामुळे साहजिकच पाटील वाडा उभा करण्यात आला. पण चित्रनगरीत एक पाटीलवाडा पुरेसा नाही ;आणि म्हणूनच आणखी एक पाटीलवाडा उभा करण्यात येत आहे, त्याचे काम लवकरच पूर्ण होईल. या वाड्यात विविध हॉल, मोठ्या खोल्या, स्वयंपाकघर, व्हरांडा, जिने, समोर अंगण, पोर्च यांसह मेकअप रुम्स, रेस्ट रुम्स असणार आहेत. पाटील वाडा २ लवकरच पूर्ण होईल आणि शूटींगसाठी सज्ज असेल

बंगला:

तुमच्या चित्रपटाच्या नव्या कथेसाठी तुम्ही जर बंगल्याच्या शोधात असाल तर तुमचा शोध संपला म्हणून समजा. प्रशस्त असा हा बंगला चित्रिकरणासाठी अत्यंत योग्य असाच आहे. आगामी चित्रीकरण स्थळांमध्ये असणारा हा बंगल्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. बंगल्याच्या आसपासची जागा आणि पार्श्वभूमी दृष्याचे सौंदर्य आणखीन खुलवेल यात शंका नाही.

चाळ:

मराठी हिंदी चित्रपट तसेच मालिकांमध्ये चाळ या चित्रीकरण स्थळाचे विशेष महत्त्व आहे. मध्यमवर्गीय कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या चाळीचे कामही सध्या अंतीम टप्प्यात आहे. सी आकारात असलेल्या या चाळीसमोर ६० बाय ६० फूट  इतक्या अंतराची मोकळी जागा आहे. या चाळीला ८ बाय आठ अशी एक सुरेख कमान आहे. कोल्हापूर चित्रनगरीत ( फिल्मसिटी) उभ्या राहत असलेल्या आगामी चित्रीकरण स्थळांमध्ये चाळ आकर्षणाचा बिंदू असेल.

वसतिगृह:

चित्रनगरीच्या नव्या लोकेशन्समध्ये होस्टेलचाही समावेश आहे. २० व्यक्ती राहू शकतील अशा क्षमतेचं हे होस्टेल आहे. या होस्टेलच्या तळमजल्यावर दोन विस्तृत हॉलसोबत रेस्टॉरंटही असेल. इथे असणारे हॉल ६०x३० फूट आकाराचे असतील. तीन मजली असणाऱ्या या होस्टेलमध्ये लिफ्टची सोयही असणार आहे.

मंदिर:

भारतीय सिनेमातील कोणत्याही कथानकाचा मंदिर हा अविभाज्य भाग असतो. फिल्मसिटीमधल्या आगामी सेट्समध्ये असणाऱ्या मंदिराच्या सेटमध्ये गर्भगृह, दीपमाळा असणार आहे. मंदिरात आवश्यकतेनुसार वापरल्या जाणाऱ्या विविध देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृह ३२ फूट बाय ३८ किंवा ४८ फूट असेल. त्याची उंची बारा फूट असेल. एवढं मोठं मंदिर थोड्याच अवधीत शूटिंगसाठी उपलब्ध होणार आहे.

रेल्वे स्टेशन:

आगामी सेट्समध्ये बांधण्यात येत असलेल्या रेल्वे स्थानकाचा विचार केला तर याचे प्लॅटफॉर्मसह २० फूट बाय २०० फूट इतके आकारमान आहे. यात २० फूट बाय २०० फूट लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. या स्टेशनमध्ये सुमारे ६०० फूट लांबीचा रेल्वे ट्रॅक आहे.