ऐतिहासिक वारसा लाभलेलं कोल्हापूर जिथे मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ रचला आणि जोपासला गेला, जे कलेचे शहर– कलनागर म्हणूनही ओळखले जाते. जिला सध्या फिल्मसिटी म्हणून ओळखले जाते. छत्रपती राजाराम महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांनी दिलेला कलाश्रय आणि बाबूराव पेंटर यांच्या प्रयत्नांतून कोल्हापूर फिल्मसिटीचे बीज पेरले गेले. भालजी पेंढारकर, मास्टर विनायक आणि व्ही. शांताराम यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी रचलेला पाया, लता मंगेशकर यांसारख्या गायक आणि संगीत दिग्दर्शक आणि सूर्यकांत आणि दादा कोंडके यांसारख्या अभिनेत्यांच्या योगदानाने चित्रपटसृष्टीचे स्थान आणखी मजबूत केले. त्यांचे अथक प्रयत्न,समर्पण, आणि मेहनतीमुळे बीजाचे वृक्षात रूपांतर झाले. अशा या पिकलेल्या मातीत अनेक मराठी चित्रपट निर्माण झाले जे गुणवत्तेसाठी आणि दर्जासाठी एकमेकांशी स्पर्धा करत होते.त्या काळात, इमारती, स्टुडिओ आणि ज्या लोकांचा यात सहभाग होता ते लोक काळाच्या पडद्याआड गेले. मात्र त्यांचं प्रेम, उत्कटता आणि दूरदृष्टीचा वारसा त्यांनी आपल्या भावी पिढ्यांना दिला.
याच वारशामुळे नवीन पिढीने नवीन आधुनिक फिल्म सिटीची निर्मिती केली आहे. दक्षिण कोल्हापूरमध्ये आणखी ७८ एकर एवढ्या भव्य जागेत फिल्मसिटी ऊभी असून चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधा आणि आधुनिक चित्रपटांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक अतिरिक्त सुविधा इथे उपलब्ध आहेत.
कोल्हापूर फिल्मसिटीमध्ये (चित्रनगरी) जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेच्या आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य आहे. इथे नवीन संधी उपलब्ध होतील आणि साहजिकच नव्या कलाकृतीही.
अन्य
आमच्या विषयी
चित्रीकरण स्थळ
कायदेशीर बाबी
नियम आणि अटी
गोपनीयता धोरण