ज्योतिबा सेट

जोतिबानावाच्या मालिकेमुळेच या सेटला हे नाव मिळाले. महेश कोठारे प्रोडक्शन निर्मित ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या गाजलेल्या पौराणिक मालिकेनंतर हा सेट इतर मालिकांसाठी वापरला जाऊ लागला. ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रदीर्घ काळ चालली होती.  चित्रनगरीत एक छोटं खेडं उभं करण्यात आलं आहे. शिवाय इथे एक मंदिरही आहे. शेगावचे संत श्री गजानन महाराज यांच्यावर आधारित मालिकेचे चित्रिकरणही याच सेटवर झाले आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक काळ दाखविण्यासाठी हा सेट अत्यंत उपयुक्त आहे. ग्रामीण वस्ती आणि ग्रामीण भागातले शोभेल असे निवासस्थान (वाडा) इथे आहे. या मालिकेसाठी उभारलेलं गाव आजही तसेच आहे. या ग्रामीण  खेड्याचा वापर समर्पक कथानकासाठी केला जाऊ शकतो.

उपलब्ध सेट्स आणि सुविधा

१.खेडे गाव ( लहान वाड्यासह)
२.मंदिर
३.फ्लोअर १ (६० फूट x १०० फूट x १८ फूट उंची
४.क्रोमा फ्लोअर -१
५. मेकअप रुम १०
६.लाँड्री एरिया
७.किचन
८. प्रॉडक्शन रुम