स्टुडिओ – 1
या सेटचे चार वेगवेगळे दर्शनी भाग आहेत. स्टुडिओ – १ च्या दक्षिणेला विमानतळ, हॉटेलचे प्रवेशद्वार आहे. पश्चिमेला पोलिस चौकी आणि पोर्च आहे, उत्तरेला न्यायालयाचा इमारतीचा दर्शनी भाग आहे. पूर्वेला एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मोठा व्हरांडा आहे.
तळमजल्यावर मोठे मोठे हॉल आहेत. शूटींग दरम्यान सहाय्यकांना राहण्यासाठी येथे चांगली सुविधा आहे. स्टुडिओ – १ वर हॉस्पिटलसाठी चांगले लोकेशन आहे. इथेच तीन बेडरुम्स आणि बाथरुमची चांगली सोय आहे. एखादं महाविद्यालय दाखवण्य़ासाठी चांगली सोय स्टुडिओ – १ मध्ये आहे. कोल्हापूर चित्रनगरीतला (फिल्मसिटी) हा स्टुडिओ कलादिग्दर्शकाच्या कलात्मक पंखांना बळ देणारा आहे. भव्य आणि देखणी अशी ही इमारत वेगवेगळ्या सेट्ससाठी वापरली जाते.
स्टुडिओ – १ मध्ये असणाऱ्या मोठ्या हॉलमध्ये काही सेट लावून त्याचाही वापर केला जाऊ शकतो. थोडक्यात हा स्टुडिओ ऑल इन वन म्हणता येईल असा आहे. स्टुडिओ – १ हा फ्लोअर ६० X ४० फूट आकाराचा आहे.
उपलब्ध सेट्स आणि सुविधा
१.पोलीस चौकी
२.कोर्ट
३.सरकारी कार्यालय
४.दवाखाना
५.रिसेप्शन काऊंटर
६.६० x ४० आकाराचा फ्लोअर
७.कॅफेटेरिया -२
८.आराम कक्ष -३
हे प्रत्येक चित्रपट किंवा मालिकेसाठी नेहमी उपयोगी पडणारे सेट्स आहे. रंग, फर्निचर यात बदल करुन कलादिग्दर्शक चित्रिकरणासाठी उत्तम परिणाम साधू शकतो. इथे उत्तम यंत्रसामग्री उपलब्ध असून चित्रिकरणासाठी हा एक परिपूर्ण स्टुडिओ आहे. कलादिग्दर्शक चित्रकाराप्रमाणे मजल्यांचा वापर कॅनव्हास म्हणून करु शकतो.