स्टुडीओ नंबर. २

१०० फूट X ९० फूट X ४५ फूट उंची इतका प्रशस्त असणारा स्टुडिओ ही चित्रनगरीत दिमाखात उभा आहे. स्टुडिओ इथल्या प्रॉपर्टीसह चित्रिकरणासाठी सज्ज आहे. स्टुडिओ मध्ये पार्टी हॉल, बेडरुम्स, डायनिंग हॉल, किचन, जीम एरिया, रिडींग रुम, मॅजिक रुम, वातानुकूलित मेकअप रुम्स, कंटेनर मेकअप रुम्ससह प्रोडक्शन रुम असा मोठा लवाजमा उपलब्ध आहे.

अलिशान बंगला आणि उच्चभ्रू व्यक्तिरेखा असलेलं कथानक दाखवण्यासाठी हा स्टुडिओ वापरला जाऊ शकतो. टॉक शोसारख्या नॉन फिक्शनसाठी लागणारे सेटही इथे उपलब्ध आहे. सोल प्रोडक्शन निर्मित स्टार प्लस या प्रसिद्ध वाहिनीवर प्रसारित झालेली ‘मेहंदी है रचनेवाली’ ही मालिका स्टुडिओ- या सेटवरच शूट झाली होती.

उपलब्ध सेट्स आणि सुविधा

१ .बेडरुम – २
२.किचन
३.डायनिंग हॉल
४.जीम एरिया
५.हॉल
६.रिडींग रुम
७.मॅजिक रुम
८. मेक अप रुम -६ ( वातानुकुलित)
९. कंटेनर मेकअप रुम – ६
१० . प्रोडक्शन रुम – २